कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक येतेय पूर्वपदावर


परतीला निघालेल्या गणेशभक्तांमुळे कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांना होणारी कर्दी हळुहळू ओसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्यांचे बिघडलेले वेळापत्रकही हळुहळू पूर्वपदावर येत आहे. एरव्ही ४-५ तास विलंबाने धावणार्‍या रेल्वेगाड्या मंगळवारी एक ते दोन तास उशिराने धावल्याने तासनतास स्थानकात खोळंबणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळत आहे. त्या त्या रेल्वेस्थानकात होणार्‍या प्रवाशांच्या गोंधळामुळे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर परतीला निघालेल्या चाकरमान्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्या गर्दीने धावत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button