कुवारबाव येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण येथील जॅकवेल कोसळली आणि रत्नागिरी शहरवासी यांचे पाण्याचे हाल सुरू झाले. तात्पुरती मलमपट्टी म्हणून काही पाणी एमआयडीसी कडून घेतले गेले.मात्र यामुळे रत्नागिरी शहरानजीक असणारी कुवारबाव ग्रामपंचायत या ठिकाणी मात्र पाण्याचा पुरवठा कमी होऊ लागला आणि पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली. ग्रामपंचायत हद्दतील स्थानिक लोक यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांना याबाबत लक्ष देण्याची विनंती केली.
शीळ धरणाची जॅकवेल कोसळली आणि MIDC चे पाणी नगर परिषदेला वळविल्यामुळे कुवारबाव वासियांचे पाण्याचे हाल सुरु झाले. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, शक्तिकेंद्र प्रमुख दीपक आपटे, नितिश आपकरे, सोहम खानविलकर, रसिक कदम यांनी एमआयडीसी कार्यलयाला भेट दिली. या भेटीत उपअभियंता मा. पाटील यांनी आज पासून हळूहळू पूर्वव्रत करू असे आश्वासन दिले व आजच पाणी सोडत असल्याचेही सांगितले.
www.konkantoday.com