जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनविभागामार्फतविविध कार्यक्रमाचे आयोजन
:- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यटन संचालनालय कोकण विभाग, भारत सरकार पर्यटन विभाग आणि केंद्रीय विद्यालय पर्यटन क्लब कुलाबा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक समुदायांमध्ये पर्यटनाचे महत्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी छत्रपती महाराज टर्मिनस येथे स्वच्छता मोहीम सामूहिक प्रतिज्ञा आणि जागरूकता कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये 80 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि पालघर डिस्ट्रिक्ट टूरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी कमरे व्हॅली रिसॉर्ट नवली कमारे जिल्हा पालघर येथे सकाळी 11.00 वाजता पर्यटन उद्योजकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.
पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि डी वाय पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टूरिझम स्टडीज, नेरूळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅव्हल फोटोग्राफी कॉम्पिटिशन 75 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या परिसरात 75 झाडे लावण्यात येणार आहेत. ट्रॅव्हल फोटोग्राफी कॉम्पिटिशन स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन संचालनायामार्फत मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
जागतिक पर्यटन दिन
स्थानिक समुदायांमध्ये पर्यटनाचे महत्व आणि त्याचे सामाजि क सांस्कृतिक आर्थिक मूल्य याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ( UNWTO) प्रत्येक वर्षा एक घोषवाक्य (थीम) जाहीर केली जाते. यावर्षीची घोषवाक्य “Tourism and Green Investment” “पर्यटन आणि हरित गुंतवणूकदार” आणि समृद्धीसाठी जास्तीत जास्त चांगली गुंतवणुकीची गरज अधोरेखित करते. त्या अनषंगाने, पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आणि भारत सरकार पर्यटन विभागात त्यांच्या संयुक्त विद्यमाने खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहे.
सिंधुदुर्ग किल्ला पर्यटन संचालनालय कोकण विभाग मुंबई आणि भारत सरकार पर्यटन विभाग तसेच विद्यानिकेतन कॉन्हेंट स्कूल पर्यटन क्लब, कसाल जिल्हा सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदूर्ग किल्ला येथे स्वच्छता मोहीम, सामूहिक प्रतिज्ञा आणि जागरुकता कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे यामध्ये 60विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एलिफंटा लेणी पर्यटन संचालनालय कोकण विभाग भारत सरकार पर्यटन विभाग आणि नायर हॉस्पिटल टुरिझम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एलिफंटा लेणी येथे स्वच्छता मोहीम सामूहिक प्रतिज्ञा आणि जागरुकता कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये 80 विद्यार्थ्याचा समावेश आहे.
अशा आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती श्री. हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी एका पत्रकान्वये दिली.
www.konkantoday.com