स्वप्नाली सावंत खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला
स्वप्नाली सावंत खून खटल्यातील आरोपी प्रमोद उर्फ़ पप्या बाबू गावणांग (रा. सडामिर्या रत्नागिरी) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. स्वप्नाली सावंत खून प्रकरणात न्यायालयापुढे खटला चालविण्यात येत आहे त्यामुळे पोलिसांचे तपास कार्य पूर्ण झाले असून आपल्याला जामीन देण्यात यावा असा अर्ज प्रमोद याच्यावतीने करण्यात आला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळेर यांनी सोमवारी जामीन अर्जावर निकाल दिला. सरकार पक्षाकडून ऍड. प्रफुल्ल साळवी यांनी युक्तीवाद केला. स्वप्नाली सावंत हिचा खून केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तिचा पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (४७), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (४३) व प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणांग यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. प्रमोद हा भाई सावंत यांच्या घरी कामाला होता. त्याच्यावर स्वप्नाली सावंत हिचा कट करून खन करणे व पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
www.konkantoday.com