सवणस खुर्द येथे वृद्धाची गळफासाने आत्महत्या
खेड तालुक्यातील सवणस खुर्द-रांगलेवाडी येथील ५९ वर्षीय वृद्धाने गुरांच्या गोठ्यात रस्सीने गळफास लावून आत्महत्या केली. वसंत नारायण रांगले असे मृत वृद्धाचे नाव आहे. राहत्या घराशेजारी असणार्या गुरांच्या गोठ्यातील भालाला रस्सीने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com