लालपरीही होणार चकाचक, एसटी महामंडळाचा निर्णय


राज्यात स्वच्छ एसटी स्थानकांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर आता एसटी बसेसच्या स्वच्छतेसाठीही मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळघने घेतला आहे. एसटी अस्वच्छ असल्यास त्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर निश्‍चित करून प्रति बस पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून एसटी गाड्यांची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांची लालपरी आता चकाचक दिसणार आहे.
सध्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पाच महिने उलटल्याने आता बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे. एसटीच्या स्वच्छतेसाठी वारंवार लेखी सूचना देवूनदेखील कार्यवाही होत नसल्याने थेट आगार व्यवस्थापकावर गाड्यांच्या अस्वच्छतेची जबाबदारी निश्‍चित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी बस मुक्कामी असल्यास त्या बसच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची असणार आहे. बेस्ट, नवी मुंबई परिवहन, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ गोवा राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या गाड्यांच्या तुलनेत एसटी अधिक अस्वच्छता दिसून येते. वारंवार परिपत्रक पाठवून, बैठका घेवून सूचना देवूनदेखील एसटी बसेसच्या स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडून गंभीरतेने कार्यवाही केली जात नाही. यामुळे दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button