
खाडीपट्ट्यात बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा बोजवारा.
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बीएसएनएलसह खाजगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा पुरता बोजवाराच उडाला आहे. कोणत्याही क्षणी दिवसभर मोबाईल सेवेत येणार्या व्यत्ययांच्या ग्राहकांना फटका बसत आहे. सेवेतील व्यत्यय दूर करण्यासाठी कुठलीच ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्राहकांची हेळसांड कायमच आहे.
कोलमडणार्या सेवेबाबत तक्रार करायची तरी कुठे, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे. बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यास त्या मोबाईल टॉवरखालीच ठिय्या ठोकण्याचा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.www.konkantoday.com