
ट्रक इंजिनमध्ये केमिकल टाकून नुकसान
राजापूर शहरातील श्री धुतपापेश्वर ट्रान्स्पोर्ट गाडीतळ या ठिकाणी उभ्या असलेल्या मालवाहू टेम्पो (भारत बेन्झ) या गाडीच्या इंजिनमध्ये कोणत्यातरी प्रकारचे लिक्वीड केमिकल टाकून इंजिन खराब करून गाडीचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी शाहीद सलीम चौगुले (रा. कोदवली, साईनगर), मुजाहिद गफूर मुजावर व रझिम खलिफे (रा. आंबेवाडी राजापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मे २०२३ मध्ये हा गुन्हा घडला आहे, तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरी बेन्झ मालक जिलानी मुसा काझी यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com