चिपळूण शहरातील विनापरवाना अनधिकृतरित्या बॅनर वर कारवाई करण्याची मागणी


रत्नागिरी शहर परिसर व मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात येणाऱ्या वाढदिवस सर्व प्रकारच्या शुभेच्छा बॅनरधारकाविरुद्ध तत्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिपळूण पालिकेचे माजी नगरसेवक ईनायत मुकदम यांनी पालिकेकडे केली आहे.शहरात विविध राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांचे फोटोसह विनापरवाना अनधिकृतरित्या बॅनर लावले जात आहेत. पॉवरहाऊस चौक ते बहादूरशेख नाका या मार्गावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गावरील बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन वाहतूककोंडीवर परिणाम होऊन अपघात घडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील महामार्गावर असलेले सर्व बॅनर तत्काळ हटवण्यात यावेत. पालिकेने शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई न केल्यास शहर परिसरात व महामार्गावर लावण्यात आलेल्या फलकाचे संपूर्ण चित्रीकरण करून त्याची चित्रफित पुरावा म्हणून उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button