स्वच्छ सागर अभियाना’चा एक भाग म्हणून मांडवी बीच आणि भाट्ये बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम
येथील भारतीय तटरक्षक वायु दलाने भारत सरकारच्या ‘मिशन लाइफ’ अंतर्गत ‘स्वच्छ सागर अभियाना’चा एक भाग म्हणून मांडवी बीच आणि भाट्ये बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविली.गणेशविसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी विविध आस्थापनांच्या सहकार्याने तटरक्षक दलाने हा उपक्रम राबविला.
भारतीय तटरक्षक वायु अवस्थान, रत्नागिरीचे कमांडंट विकास त्रिपाठी (कमांडिंग ऑफिसर) यांच्या मार्गदर्शनाखाली भाट्ये समुद्रकिनारा आणि मांडवी समुद्रकिनारा येथे स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी व जवान यांच्यासोबतच बॅंक आॅफ इंडिया, आकाशवाणी, आयकर कार्यालय, सीमाशुल्क, कोकण रेल्वे, दीपस्तंभ, पंजाब नॅशनल बॅंक, भारतीय स्टेट बॅंक, सेंट्रल बॅंक, आणि रत्नागिरी नगर पालिका सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com