वाळू व्यावसायाच्या बहाण्याने १ कोटी १० लाखांचा चुना, फसवणुकीची तक्रार दाखल
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे वाळू व्यवसायात मोबदला देण्याचे आमिष दाखवून १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपले पैसे बुडाल्याचे लक्षात येताच संबंधित तरूणाने जयगड पोलिसांत धाव घेत फसवणूक करणार्याविरोधात तक्रार दाखल केली. चंद्रशेखर वसंत गडदे असे तक्रारदाराचे नाव असून पोलिसांनी फसवणूक करणार्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
कमलेश विद्याधर सुर्वे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कमलेश याने आपण वाळू व्यवसाय करणार असल्याची बतावणी चंद्रशेखर यांना केली होती. व्यासायासाठी आपल्याला पैशाची गरज असून वाळू व्यवसायात प्रतिटन २५० रुपये मोबदला देण्याचे आमिष कमलेश याने चंद्रशेखर यांना दाखवले. कमलेश याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर यांनी सन २०२० ते २०२२ या काळात १ कोटी २१ लाख २५ हजार कमलेश याला दिले.
सुरूवातीला कमलेश याने व्यवसायात चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन करून आपला व्यवसाय सुव्यवस्थित चालला असल्याचे सांगितले. त्यासाठी काही रक्कम कमलेश यांना चंद्रशेखर यांना देवू केली. चंद्रशेखर यांच्याकडून घेतलेल्या १ कोटी २१ लाख २५ हजार रुपये कमलेश याने चंद्रशेखर यांना देवू केली. आपला व्यवसाय तेजीत चालू असून उर्वरित रक्कम देखील आपण चुकती करू, अशी बतावणी कमलेश हा चंद्रशेखर यांच्याजवळ करत होता. मात्र अनेक महिने उलटून गेले तरी कमलेश हा पैसे देण्याचे नाव काढत नव्हता. अखेर चंद्रशेखर यांनी पैशासंबंधी विचारणा केली असता कमलेश हा उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. सातत्याने तगादा लावूनही कमलेश पैसे देण्यासंबंधी कानाडोळा करू लागला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे चंद्रशेखर यांच्या लखात आले या प्रकरणी त्यांनी कमलेश याच्याविरोधात जयगड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कमलेश याच्याविरूद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com