
रेल्वे प्रवासादरम्याने चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक.
दिनांक 12/06/2023 रोजी, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 173/2023 भा.द.वि. संहिता कलम 379 मध्ये एकूण ₹ 15,499/- किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता तसेच राजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 30/06/2023 रोजी दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 93/2023 भा.द.वि. संहिता कलम 379 मध्ये एकूण ₹ 20,000/- किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
हे दोन्ही गुन्हे रेल्वे प्रवासा दरम्याने घडलेले असल्याने पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी, रत्नागिरी जिल्ह्यातील, रेल्वे प्रवासा दरम्याने घडलेल्या सर्व चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला व सर्व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.
या सूचनांच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला व तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे वरील नमूद दोन्ही गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात आला व आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश, 27 वर्षे, रा. छर्पिया, पोस्ट महुवार, रुर्धेली खुर्द, जि. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश यास दिनांक 24/09/2023 रोजी मडगाव, गोवा राज्यातून अटक करण्यात आली आहे.
आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने वरील नमूद दोन्ही गुन्हे आपण स्वतः केले असल्याची कबुली दिली आहे, तसेच त्याच्या कडून ₹39200 रुपये किंमतीचे 04 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत व दोन्ही गुन्ह्यांतील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत रेल्वे प्रवासा दरम्याने चोरीच्या गुन्ह्यांमधील आतापर्यंत एकूण ₹66,699/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने रेल्वे प्रवासा दरम्यान आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
सहायक पोलीस निरीक्षक श्री. अमोल गोरे,
पोहवा विजय आंबेकर,
पोहवा/ सागर साळवी,
पोहवा/योगेश नार्वेकर,
पोना/ दत्तात्रय कांबळे व
पोकॉ/ अतुल कांबळे.
www.konkantoday.com