
रत्नागिरी हरचेरी रस्त्याच्या अनेक समस्यांबाबत भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांचे कार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन
रत्नागिरी देवधे महामार्ग क्रमांक 165 वर अनेक कामे मंजूर असून दोन दोन वर्षे वर्क ऑर्डर होऊन पूर्ण झाली नाहीत, तर याचं मार्गांवर टेम्भे ते टिके चाळकेवाडी रस्ता पूर्ण खराब झाला असून रस्त्याची चालण झाली आहे. वाहन चालवणे सोडा पदचारी नीट चालू शकत नाहीत देखभाल दुरुस्तीच्या नावावर शासनाचे लाखो रुपये या महामार्गांवर खर्च होतात परंतु डिपार्टमेंट मार्जितील परप्रांतीय ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम करतात म्हणूनच खड्डे भरण्याचा केलेला फार्स एक महिनाच होता.पावसाळ्यापूर्वीच या महामार्गांवर अनेक खड्डे परत पडले. हे खड्डे तात्काळ भरण्यात यावेत अशी आग्रही मागणी दादा दळी यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली.व कार्यकारी अभियंता यांनी येत्या आठ दिवसात हे रस्ता दुरुस्ती करतो असे सांगितले.
या महामार्गांवर चांदेराई पुलाचा मधला खांब धोकादायक असल्याने माजी सरपंच शिल्पा दळी यांनी 2019 ला पत्र दिले होते त्या प्रमाणे PWD चे अधिकारी यांनी भेट देऊन एका खाबाचे काँक्रित पडले आहे त्याला रिंग करून सपोर्ट देता येईल असे सांगितले त्या प्रमाणे 2020 मध्ये मंजूर झालेले काम अद्याप का पूर्ण झाले नाही? पुलाचा कठडा तुटलेला 2 महिने झाले अध्याप का दुरुस्त झाला नाही ? की आपण सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची वाट बघताय असा सवाल केला..
चांदेराई मलुष्ट्येवाडी येथे गबियन वॉल बांधायला दगड नाही मिळाला वा अन्य कोणत्या कारणामुळे बांधता येणार नव्हते मग ठेकेदाराने खालच्या बाजूला खोदाई का करून ठेवली? त्यामुळे अजून भाग कोस ळला.आज या भागातून पादचारी जीव मुठीत घेऊन जातात येथे कोणती दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? चांदेराई आगवे कुरतडे रस्ताचे चढ कमी करण्याच्या कामाला भूमिपूजन होऊन 2 वर्षे झाली अद्याप काम का सुरु नाही? असे अनेक प्रश्नांचा तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी भडीमार केला..यावर कार्यकारी अभियंता ओठवणेकर साहेब, उप अभियंता भारती साहेब यांनी तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासित केले.
यावेळी दादा दळी यांच्या सोबत भाजप चे सुशांत पाटकर, गुरु दास गोविलकर, आबा सांडिम, राजा सांडिम, महेश गांगण, ऋग्वेद दळी, प्रसाद बेर्डे, उस्मान काझी, जगन पवार, संदीप पवार, ओंकार दळी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com