
पुढच्या वर्षी बाप्पा १२ दिवस लवकर येणार
पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन १२ दिवस अगोदर शनिवार ७ सप्टेबर २०२४ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
पुढच्यावर्षी २०२४ मध्ये गौरीबरोबर विसर्जन होणार्या गणपतींचा मुक्काम ६ दिवसाचा व अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार्या बाप्पांचा मुक्काम ११ दिवसाचा असणार आहे. कारण पुढच्या वर्षी शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे तर गौरी विसर्जन गुरूवार १२ सप्टेंबर २०२४ रोजी आहे तर अनंत चतुर्दशी मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे.
www.konkantoday.com