![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230912-WA0004.jpg)
खेड बसस्थानकातून महिलेचे लाखाचे दागिने लांबवले
आठवडाभरापूर्वीच खेड बसस्थानकातून एका महिलेचे अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिलेच्या पर्समधून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील महिला पती, मुलगा व मुलीसह येथे आले होते. वाकवली येथे जाण्यासाठी दुपारी ३.१५ च्या सुमारास ते बसस्थानकात उभ्या असलेल्या खेड-दापोली बसमध्ये चढले. बसमधून प्रवास करत वाकवली येथे उतरल्यानंतर तांदूळ खरेदीसाठी किराणा मालाच्या दुकानात गेले. तांदळाचे पैसे देण्यासाठी पर्स उघडली असता सोन्याचे १ लाख २९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १ हजार रुपये चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. मात्र ही घटना खेड बसस्थानक ते वाकवलीदरम्यान घडल्याने हा गुन्हा येथील पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com