
आंबवली येथे महिलेची आत्महत्या
दापोली तालुक्यातील आंबवली खुर्द धाकटी अंबवली येथे राहणारी दीपिका भुवड (४३) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते रात्री ९ च्या दरम्यान घडली.
शनिवार २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी दिपिका घरी आढळून आली नाही. तिचा सहगळीकडे शोध घेण्यात आला. त्यावेळी ती राहत्या घराच्या मागे वहाळाच्या बाजूस असणार्या विहिरीमध्ये आढळून आली. दिपिका ही खूप दिवस आजारी होती. आजारपणाला कंटाळूनच तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याची खबर दापोली पोलीस ठाण्यात मदन भुवड यांनी दिली. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. www.konkantoday.com