
परतीच्या प्रवासातही रेल्वेच्या नियोजनाचा अभाव
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी पाच दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन करुन परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र परतीच्या प्रवासातही रेल्वेच्या नियोजनाचा अभाव असल्याचे पाहायला मिळतंय.परतीच्या प्रवासासाठी कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना सर्वाधीक पसंती असते. मात्र गणपती स्पेशल रेल्वे गाडी चार तास, तर तुतारी एक्सप्रेस दीड तास उशीरा धावत आहेत.त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. तसेच फ्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आल्याने झुंबड उडाल्याचं दिसून आलं. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांचं योग्य नियोजन करावे अशी मागणी कोकणवासीय करतायत.
चिपळूणच्या सावर्डे स्थानकावर मुंबई, पुण्याकडे परतण्य़ासाठी लोकांची चांगलीच लगबग सुरू आहे. गणपती स्पेशल ट्रेन्स उशिरानं धावत असल्यानं रेल्वे स्थानकांवर बरीच गर्दी होतेय. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर आणि पुणेकर रेकॉर्ड ब्रेक संख्येनं कोकणात गेले होते. त्यामुळे जाताना आणि येताना दोन्ही वेळेला ट्रेन्स फुल्ल आहेत. आपली ट्रेन पकडण्यासाठी चाकरमान्यांना धावपळ करावी लागत आहे
www.konkantoday.com