जगबुडी पुलावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी पुलावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२२) घडली होती. यातील रवींद्र गोपाळ गावडे (वय ४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रवण रवींद्र गावडे (१२), स्वप्नील सुतार (३१, तिघे रा. तुळशी खुर्द, खेड) अशी अन्य जखमींची नावे आहेत. दुचाकीवरून तिघेजण भरणे येथील जगबुडी पुलावरून जात असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. जखमींना मदतकार्य केले. रुग्णवाहिका चालक सुरेश हंबीर यांनी जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
www.konkantoday.com