लम्पीग्रस्त जनावरांच्या बंदोबस्ताकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रत्नागिरी शहरात मोकाट गुरांना लंपीची बाधा झालेली असताना या जनावरांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे. लम्पीग्रस्त गुरांच्या अंगातून पडणारे रक्त रस्त्यावर सांडत असल्याचे प्रकार गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचारांसाठी प्रशासनाने लक्ष घालून त्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहेे.
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा उपद्रव थांबवण्यासाठी त्यांना पकडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शहरात ३०० मोकाट गुरे असून त्यापैकी २० जनावरांना लम्पी झाला आहेे, असे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी सांगितले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात येणार्या असंख्य गुरांना लंपीची लागण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी रस्त्यावर लंपीग्रस्त गुरे बसतायत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. www.konkantoday.com