
मुलींचे फोटो वापरून “फेक प्रोफाइल” बनवून अनेक अविवाहित व विधुर तरुणांना लुबडणाऱ्यास ठकाला खेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या.
www.shaadi.com” या संकेत स्थळावर सुंदर मुलींचे फोटो वापरून “फेक प्रोफाइल” बनवून अनेक अविवाहित व विधुर तरुणांना लुबडणाऱ्यास खेड पोलीसांनी बेड्या ठोकल्याआहेत
आपला विवाह एका योग्य व सुंदर मुलीशी व्हावा या हेतूने अनेक तरुण इंटरनेट वरील उपलब्ध विविध ( matrimonial websites ) विवाह संकेत स्थळांचा, मुली (विवाह-स्थळ) पाहण्यासाठी उपयोग करत असतात.
या संकेत स्थळांवर असणाऱ्या मुलींच्या प्रोफाइल या विवाह संकेत स्थळांमार्फत वेरीफाईड ही करण्यात येत असतात परंतु काही इसमांद्वारे जसे खेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 277/2023 मधील अटक अट्टल गुन्हेगारामार्फत अश्या विवाह संकेत स्थळांमध्ये सुंदर मुलींचे फोटो वापरून फेक प्रोफाइल ही बनविल्या जातात व यातून अनेक अविवाहित व विधुर तरुणांना आपले लक्ष्य केले जाते.
खेड, रत्नागिरी येथील असेच एका विधुर तरुणाने आपल्या विवाहासाठी उचित स्थळ मिळावे या हेतूने विविध (matrimonial websites ) विवाह संकेत स्थळांवर आपली प्रोफाइल तयार केली होती. ज्यामधील www.shaadi.com या विवाह संकेत स्थळावर आपल्या प्रोफाइल द्वारे पाठविण्यात आलेल्या request वर एका सुंदर मुलीने आपला होकार व पसंती कळविली. या सुंदर मुलीने काही दिवसातच या तरुणाबरोबर WhatsApp वर संवाद साधत आपले आणखिन नवे फोटो शेअर केले. पुढे काही दिवसात, घरी आपले आई वडील आजारी असल्याची बतावणी करून या तरुणाकडे पैशांची मागणी केली.
ही सुंदर तरुणी आपल्याबरोबर विवाह करणार या आनंदात खेड येथील या विधुर तरुणाने कोणतीही शहानिशां न करता केवळ सुंदरतेवर भाळून तिला वेळोवेळी रक्कम रुपये 77,000/दिले व विवाहाची बोलणी सुरू करताच तिच्याकडून टाळाटाळ करण्यात येत होते. आपण दिलेले पैसे परत मागताच मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आला.
मोबाईल नंबर ब्लॉक होताक्षणी आपली मोठी फसवणूक झाल्याची या विदुर तरुणाला लक्षात आले व त्याने थेट खेड पोलीस ठाणे गाठले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय अधिकारी मुणगेकर, खेड पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस तपास पथक स्थापन करण्यात आले व दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 277/2023 भा. द. वि. संहिता कलम 420 व आयटी अॅक्ट कलम 66 (ड) अन्वये गुन्ह्याच्या सर्व तांत्रिक बाजू तपासण्यात आल्या व या गुन्ह्यातील आरोपी मनोज छोटुराम योगी 41 वर्षे, रा. लोढा हेंवंस, डोंबिवली वेस्ट, जिल्हा ठाणे मूळ राहणार राजस्थान यास ठाणे येथून दिनांक 22/09/2023 रोजी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
या गुन्ह्याकरिता वापरण्यात आलेले 2 मोबाईल व एक Chevrolet Cruize चारचाकी गाडी जप्त करण्यात आलेली आहे.
या आरोपीने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक घटस्फोटीत व विधुर पुरुषांना टारगेट केले असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का? याबाबत खेड पोलीसांमार्फत अधिक तपास सुरु आहे.
टी कारवाई खालील बम पोलीस अधिकारी/संसलदार यांनी केलेली आहे.
www.konkantoday.com