दुचाकी अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू


रत्नागिरी ते पावस मार्गावरील वायंगणी फाटा येथे गुरुवारी झालेल्या दोन दुचाकी अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. नारायण वासूदेव चिपळूणकर (74, रा. मांडवकरवाडी, कोळंबे, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास वायंगणी-फाटा अलिकडे साळवी गार्डन येथे वळत असताना घडली होती.
गुरुवारी प्रसाद दिपक मुरकर (23, रा. मागलाड – रत्नागिरी) हा दुचाकी (एमएच-08 एएच 5122) वरुन नारायण चिपळूणकर यांना सोबत मागे बसवून रत्नागिरी ते पावस रस्त्यावरुन जात होते. वायंगणी फाटा येथील साळवी गार्डन येथे इंडिकेटर देऊन वळत असताना मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच- 06 – एडब्ल्यू 0703) वरील स्वार सिद्धेश गुरव याने जोरदार धडक दिली. या धडकेत चिपळूणकर व गुरव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारासाठी दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान चिळूणकर यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी चिळूणकर यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर दुपारी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button