जगबुडी नदीत मगरींचा वावर असल्याने विसर्जनासाठी नदीत उतरणाऱ्या गणेश भक्तांमध्ये धाकधूक


*खेड येथील जगबुडी नदीत मगरींचा वावर असल्याने विसर्जनासाठी नदीत उतरणाऱ्या गणेश भक्तांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे
खेड शहरातील जगबुडी नदीमध्ये अनेक मगरींचा वावर असल्याने दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना येथील विसर्जन कट्टा मंडळाच्या सदस्यांना आपला जीव मुठीत धरून गणरायाचे विसर्जन करावे लागले होते.या मगरींना पळवून लावण्यासाठी नदीमध्ये फटाक्यांचे बॉम्ब फोडून त्यांना पळवून लावावे लागले होते
याची दखल वनविभागाने घेऊन पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये कोणती अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अनेक छोट्या मोठ्या मगरी पावसाच्या पाण्यामुळे आल्या आहेत. त्या येथील प्रवाहात मुक्त फिरताना दिसत असल्याने अनेकांनी जगबुडी नदीत उतरणे बंद केले आहे. सध्या गणपती विसर्जनाची तयारी सुरू असून दीड दिवसाचे गणपती विसर्जन करत असताना या मगरी पाण्याच्या मधोमध येत असल्याने गणपती विसर्जन करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या मगरींना पळवून लावण्यासाठी पाण्यात फटाके फोडून त्यांना पळवत विसर्जन करावे लागत होते. शनिवारी ५ दिवसाच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. विसर्जन रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता असल्याने या मगरींचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील गणेश विसर्जन कट्टाच्या सदस्यांनी केली आहे. अनंत चतुर्दशीला खेडमधील तीन मोठ्या गणपतींचे विसर्जन या जगबुडी नदीत होणार आहे. यामुळे हे विसर्जन रात्री उशिरा होण्याची शक्यता असून जगबुडी नदीमधील मगरीमुळे कोणते विघ्न येऊ नये, यासाठी वन विभागाकडून जाळी बसविण्याची गरज आहे.जगबुडी नदी हे मगर प्रवण क्षेत्र असल्याने गणपती विसर्जन करताना मंडळाच्या सदस्यांनी खोल प्रवाहात जाऊ नये, त्याचप्रमाणे गणपती विसर्जनस्थळी विसर्जन कट्टा मंडळाच्या मदतीसाठी वनविभागाची रेस्क्यू टीम तैनात असणार आहे. यामुळे गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडेल, असे वनपाल सुरेश उपरे यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button