चिपळूण शहरात गणेशोत्सवासाठी भक्तांना शुभेच्छा देणारे फलक झाले उदंड
सध्या चिपळूण शहराकडे पाहिलेल्यानंतर गणेशोत्सवासाठी भक्तांना शुभेच्छा देणारे फलक उदंड झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेचा कर वाचविण्यासाठी अनेकांनी परवानगी न घेताच हे फलक उभारले आहेत. पॉवरहाऊस परिसर सध्या अपघाताचे क्षेत्र ठरले असतानाच येथे मोठमोठे सर्वाधिक फलक लावण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील बहाद्दूरशेख नाका, पॉवरहाऊस, चिंचनाका, कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, गांधी चौक, भेंडीनाका बाजारपूल, गोवळकोट कमानी परिसर ही महत्वाची ठिकाणे कायमच राजकारणी, व्यावसायिक यांच्या जाहिरातींच्या फलकांनी भरलेली दिसून येतात. यासाठी काहीजण नगर परिषदेची परवानगी घेतात, तर काहीजण कर भरावा लागू नये म्हणून परवानगी घेणे टाळतात. यावर्षी तर शेकडो जाहिराती फलक शहरात दिसून येत असताना केवळ एकाच लोकप्रतिनिधीने नगर परिषदेकडे अर्ज केला आहे. मात्र त्यालाही प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. www.konkantoday.com