केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
मुंबई, दिनांक २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.
केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com