एमआयडीसीचे पाणी नगर परिषदेत टाकीत टाकण्याच्या पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर नव्हे तर आपल्या गतीने सुरू, पाण्यासाठी नागरिकांची वणवण
(आनंद पेडणेकर)
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळधरणाची जॅकवेल कोसळल्यानंतर गणेशोत्सवात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे यावर उपाययोजना करण्यासाठी एमआयडीसी करून पाणी घेण्यात येणार आहे
रात्री ऊशिराने व्हॉल आणि पाईप रत्नागिरी येथे आल्या नंतर साळवी स्टॉप येथिल पाण्याच्या टाकी जवळ आज सकाळ पासून काम चालू करण्यात आले आहे नेहमी प्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेचे अपूरे मोजकेच कर्मचारी हे काम करताना दिसत आहेत वास्तविक लोकांची गरज लक्षात घेत आहे काम युद्ध पातळीवर करणे आवश्यक होते त्यासाठी आवश्यक तर इतर यंत्रणेची देखील मदत घेणे आवश्यक होते मात्र नगरपरिषद आपल्या नेहमीच्या गतीने हे काम करीत आहे साळवी स्टॉप पासून माळ नाका व अन्य भाग शिळपाणी पुरवठ्यावर अवलंबून असल्याने ऐन सणाच्या दिवसात या भागाला दोन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे या भागाला पर्यायी पाणी व्यवस्था करण्याबाबत नगर परिषदेने आ ज पर्यं न्त नागरिकांच्या पाणी पुरवठ्या चा कोणताच विचार केलेला नाही त्या भागातील लोक प्रतिनिधी देखील याबाबत आवाज उठवत नसल्याने नागरिकांच्या नाराजी आहे M I D C च चीलाईन चे पाणी आता नगर परिषदेच्या जलशुद्धी केंद्राच्या टाकीत पाणी सोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे शिळ येथिल जॅकवेल जवळील नदीपात्रा पाणी कमी झाल्यानंतरच त्या ठिकाणी जॅक वेलचे काम सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाकडून काही दिवसात काम पूर्ण होईल असे सांगण्यात आहेत असले तरी त्याच्या कामाची गती पाहता मुदतीत काम पूर्ण होणे बाबत शंका उपस्थित होत आहे तोपर्यंत रत्नागिरीतील नागरिकांना एमआयडीसीच्या पाण्यावर एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे
www.konkantoday.com