राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेत रत्नागिरीचे खेळाडू चमकले
पुणे बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या ४४ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले. १ सुवर्ण, १ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण ८ पदकांची लयलूट रत्नागिरीच्या खेळाडूंनी केली.
महाराष्ट्र कराटे असोसिएशनमार्फत जिल्हा क्रीडासंकुल बारामती जिल्हा पुणे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धा सबज्युनियर, कॅडेट, ज्युनियर व सीनीयर ग्रुपमध्ये वजन गट व वयोगट प्रकारात घेण्यात आल्या. स्पर्धेत जिल्ह्यातील कराटे संघाने घवघवीत यश प्राप्त केले. त्यामधील राटे खेळाडू सबज्युनियर गटामध्ये ७ वर्षाखालील दुर्वांक संजय मोरे, काता प्रकार (रौप्यपदक) ८ वर्षाखालील समर्थ संजय राठोड फाईट व काता प्रकार (कास्यपदक), शौर्य प्रकाश राठोड फाईट प्रकार (कास्यपदक) ५० किलो खाली वजन गटात ध्रुव धनंजय बसनकर फाईट प्रकार (कास्यपदक), कॅडेट ग्रुपमध्ये ५२ किलो खालील वजन गटात दिव्य सुनील यादव कालाप्रकार (कास्यपदक), ज्युनियर ग्रुपमध्ये ५९ किलो खालील मुलींमध्ये वेता सुरेश खानविलकर काता प्रकार (कांस्यपदक) तसेच ७६ किलो खालील मुले प्रेम अरूण बेग (फाईट प्रकार सुवर्णपदक) या सर्व मुलांच्या चांगल्या कामगिरीमुळे १ सुवर्णपदक, १ रौप्यपदक, ६ कांस्यपदक अशी एकूूण ०८ पदके जिल्ह्याला प्राप्त झाली.
www.konkantoday.com