एसटीच्या यांत्रिकी विभागात २०० जागांवर तात्पुरत्या भरतीचे निर्देश
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी विभागामध्ये प्रशिक्षणार्थी यांत्रिकी विभागातील भरती व्हावी यासाठी कोकण एसटी प्रेमी ग्रुपतर्फे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना निवेदन देण्यात आले होते. केदार साठे यांनी याबाबत तातडीने लक्ष देत एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला. त्यांना रत्नागिरी विभागातील यांत्रिकी आस्थापनेबाबत माहिती दिली व स्थानिक आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीना यामध्ये न्याय मिळेल असे सांगितले.
चन्ने यांनी रत्नागिरी विभाग नियंत्रक बोरसे यांना तातडीने तात्पुरत्या भरती संदर्भात निर्देश दिले. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामुळे एसटीमध्ये सुमारे २०० जागांवर स्थानिकांना तात्पुरती नोकरी मिळणे सोपे झाले आहे. या वेळी कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विकास गुरव, शैलेंद्र केळकर, आसिफ खलिपे उपस्थित होते.
www.konkantoday.com