शिवतेज संस्थेतर्फेगणेशोत्सवानिमित्ताने व्यसनमुक्तीचा प्रचार
खेड तालुक्यात जामगे गावी यावर्षी गौरी गणपती सणानिमित्त शिवतेज संस्थेतर्फे व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जाखडी लोककला सादर करणार्या कलाकारांना प्रोत्साहन देवून तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे म्हणून सलग २८ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मंगळवारी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर या उपक्रमाला सुरूवात झाली.
गणराय ही कलेची देवता. सकल देवतांचा आराध्य गणराय कोकणात भक्तांच्या मनात व घरात विराजमान झाला आहे. या उत्सवात अस्सल कोकणी जाखडी व भजन कलेला हक्काचे स्थान असते. या कलेतून भक्तीभाव जागृत करण्यासोबत कलाकार समाज प्रबोधन शेकडो वर्षापासून करत आले आहेत. त्यांच्या या कलेला जामगे या आपल्या मूळ गावी शिवसेना नेते रामदास कदम यांनी गेल्या २८ वर्षापासून राजाश्रय मिळवून दिला आहे.
www.konkantoday.com