नारायण राणे मंत्री होऊ शकतात त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो. मग किरण सामंत खासदार का होऊ शकत नाही-रामदास कदम
रामदास कदम हे स्पष्ट वक्ते आणि आक्रमक वक्तृत्व शैली असलेले नेते म्हणून ओळखले जातात. रामदास कदम यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उदय सामंत यांचे ज्येष्ठनारायण राणे मंत्री होऊ शकतात त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो. मग उदय सामंत मंत्री होऊ शकतात, तर मग त्यांचा भाऊ किरण सामंत खासदार का होऊ शकत नाही. बंधू किरण सामंत हे का खासदार होऊ शकत नाहीत? असा सवाल करत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे उदाहरण देत या जागेवर शिवसेना उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. गणेशोत्सवासाठी खेड तालुक्यात जामगे येथे आपल्या गावी आलेल्या रामदास कदम यांनी माध्यमांजवळ संवाद साधला.
ते म्हणाले की, नारायण राणे मंत्री होऊ शकतात त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो. मग उदय सामंत मंत्री होऊ शकतात, तर मग त्यांचा भाऊ किरण सामंत खासदार का होऊ शकत नाही. त्यामुळे किरण सामंत यांना आपला पाठिंबा आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांचे आहेत, असे सांगून भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर बोलणे टाळले. समृद्धी महामार्गाचे काम हे तीन वर्षात होऊ शकते तर कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प बारा वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही, याबद्दल जाहीर नाराजी रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कशेडी बोगदा सुरू झाल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, त्याबाबत माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी नाराजी व्यक्त केली आणि सतेत असूनही नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहे दिला.
www.konkantoday.com