
जल जीवन मिशन’अंतर्गतजिल्हाभरात ३ लाख ३४ हजार ३६९ घरगुती नळजोडणी
जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणीची प्रक्रिया १०९ गावांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे, तर जिल्हाभरातील ३ लाख ३४ हजार ३६९ घरगुती नळजोडणी करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यात घरगुती स्तरावर नळजोडणी देण्याचे ७६.३६ टक्के पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाद्वारे नियमित, शुद्ध आणि ५५ लिटर प्रति माणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जल जीवन मिशन’ची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे.
www.konkantoday.com