चिपळूण नगर परिषदेने खड्डे बुजविण्यासाठी वापरला मातीमिश्रीत गाळ
चिपळूण शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. त्यांच्या डागडुजीचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. पण हे खड्डे खडीने न भरता नदीपात्रातील मातीमिश्रीत गाळाने भरले जात आहेत. त्यावर बारीक खडी टाकून डांबराने बुजविले जात आहेत. खडीऐवजी मातीमिश्रीत गाळ खड्डे बुजविण्यासाठी वापरणे हे कोणत्या शास्त्रात बसते हे नगरपालिकेने एकदा सांगावे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव यांनी केला आहे. www.konkantoday.com