सकारात्मक बदल !विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या तुरुंगातील कैद्यांच्या हातांनी बनल्या यंदा शेकडो गणेशाच्या मुर्त्या
विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या तुरुंगातील कैद्यांच्या हातांनी यंदा चक्क बाप्पा घडवला आणि या गजाआडच्या मूर्तीची आता अनेक घरांमध्ये प्रतिष्ठापणा झाली नाशिक व धुळे तुरुंगातील १३ कैदी कलाकारांनी घडवलेल्या पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती तुरुंग प्रशासनाने विक्रीसाठी ठेवल्या होत्या
एकट्या नाशिक कारागृहाच्या ८ कैद्यांनीच तब्बल ७५० मूर्ती तयार केल्या. त्यात शुभ्र कमल, बालगणेश, लालबागचा राजा तसेच दगडूशेठ गणपतीसारख्या मूर्तीचा समावेश आहे. नाशिक कारागृहातील कैदी फुलराम मेघवाड हा तसा मुर्तीकारच आहे. तो सध्या आजीवन कारावास भोगत आहे. त्याला नाशिक येथून धुळे कारागृहात आणण्यात आले. त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत त्याला तुरुंगातच मुर्ती बनवण्याचे साहित्य पुरवण्यात आले. तुरुंगात कलेची ही उपासना करताना त्याने कारागृहातील इतर चार कैद्यांनाही मूर्तीकला शिकवली. हे चारही आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. या सर्वांनी मिळून या मूर्ती तयार केल्या आहेत.
www.konkantoday.com