
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मध्यरात्री पोलिसांच्या वाहनाला दिली दुचाकीस्वाराने धडक
रत्नागिरी : गस्त घालणार्या पोलिसांच्या वाहनाला भरधाव व बेदरकारपणे येणार्या दुचाकीने पाठीमागून धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री 28 रोजी मध्यरात्री झालेल्या या अपघातप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र दिनेशचंद्र सिंग (राहणार रत्नीपूर भिखेपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार प्रसाद जाधव यांनी तक्रार दिली आहे. रविवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व प्रसाद जाधव गस्त घालत होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट नं. 2 समोर अॅक्सेस (एमएच-08-एई-9586) दुचाकीचा अपघात झाला होता. त्याची पाहणी पोलिस करत होते. यावेळी देवेंद्र सिंग आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एई-4636) घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्याने अपघाताची पाहणी करत असलेल्या पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून देवेंद्र सिंग जखमी झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.