
दीपक मकवाना यांचे घरात वंदे भारत च्या मकरात श्री गणेश
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीकरिता देखील विविध देखावे तयार केले जातात. सांताक्रुझच्या अयोध्या इमारतीमधील रहिवासी दिपक लहुजीभाई मकवाना यांच्या घरी गेल्या ३२ वर्षापासून पाच दिवस गणराय विराजमान होतात. दरवर्षी मेक इन इंडिय़ा अंतर्गत घडलेल्या महत्वपूर्ण गोष्टींचा देखावा दिपक उभारतात. दिपक हे स्वत: इंटेरियल डिझाइनर आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवाकरिता त्यांनी चक्क केसरी रंगातील वंदे भारत एक्सप्रेस तयार केली आहे. प्लायवूड, एमडीएफ, प्लास्टीक आणि मेटलचा वापर करीत १५ बाय ६ फूट लांबीची आणि ६ फूट उंचीची वंदे भारत तयार केली आहे. या एक्सप्रेसच्या ड्रायव्हर सीटवर गणराय विराजमान होणार आहेत. तर चार भाविक एक्सप्रेसमध्ये बसून गणरायाची आरती आणि दर्शन करु शकतील. याकरिता सीएसएमटी स्थानकाचा लूक तयार करुन एक्सप्रेस उभी केली आहे.
या कामात दिपक यांना त्यांच्या पत्नी धारीनीसह दिया, खुशी, योम, प्रथम, शुभ आणि प्रथा या त्यांच्या मुलांची देखील मोलाची साथ मिळाली आहे.याआधी चंद्रयान टू,बांद्रा-वरळी सी लिंक,कोविड लस, चिनाबचा रेल ब्रीज,अयोध्या राम मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा देखावा उभारला होता.
www.konkantoday.com