कॅरम असोसिएशन मान्यतेने 12, 14,18, 21 वयोगट मुले मुली जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा 1 ऑक्टोबर २०२३ रोजी
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन मान्यतेने 12, 14,18, 21 वयोगट मुले मुली जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा 1 ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन ( राष्ट्रीय संघटना ) व आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार खेळवली जाईल. ही जिल्हा कॅरम स्पर्धा असल्याने खेळाडूंनी 2023- 2024 या वर्षाची रजिस्ट्रेशन फी रु. 50 जिल्हा असोसिएशन कडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश ही एकेरी गटासाठी रुपये 100 असेल प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार 27 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्का सहित खालील ठिकाणी द्यावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट खेळाडूंना परिधान करणं आवश्यक आहे मागवून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असे आयोजकांनी कळवले आहे.
गुहागर : प्रदीप परचुरे 9423048250
रत्नागिरी : विनायक जोशी 8390387483
देवरुख : मोहन हजारे 9422053943, राहुल भस्मे 9657637678
चिपळूण : साईप्रकाश कानिटकर 9403564782,दीपक वाटेकर 9975546625
संगमेश्वर: मनमोहन बेंडके 9130306525
लांजा : विकास इंदुलकर 9403769449
राजापूर : मनोज सप्रे 9403768376
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राष्ट्रीय पंच सचिन बंदरकर व राज्यस्तरीय पंच मंदार दळवी यांची निवड करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचा आवाहन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे प्रदीप भाटकर (अध्यक्ष ), सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष), सुचय अण्णा रेडीज (सल्लागार), मिलिंद साप्ते (सचिव) मोहन हजारे (सदस्य ) यांनी केलं आहे.
www.konkantoday.com