कोकणात आज बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले
चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. बहुतेक ठिकाणी प्रतिष्ठापना दिनीच बाप्पा घरी आणला जातो. रत्नागिरी जवळच्या तोणदे गावात चक्क होडीतून गणराय घरी गेले. तोणदे आणि हातीस ही गावे काजळी नदीने जोडली जातात.
हातीसमध्ये तयार होणारे गणपती होडीने तोणदे येथे जातात. पूर्वी या गावांमध्ये पुलाची व्यवस्था नव्हती. तेव्हापासून होडीने गणपती तोणदे गावात नेले जात. तीच प्रथा अजूनही कायम आहे. ढोल ताशांच्या गजरात गणराय होडीतून घरोघरी गेले. गणरायाच्या आगमनामुळे भक्तांच्यात देखील मोठा उत्साह संचारला होता
www.konkantoday.com