रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला

0
23

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या महिनाभरात ५ तालुक्यांमध्ये ७५२ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. लम्पी आजारामुळे ६१ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून देण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लम्पी रोगाचा आजार वाढला आहे. लम्पीग्रस्त जनावरे रस्त्यावरून हिंडताना दिसत आहेत. त्यामुळे त्या जनावरांची लागण अन्य जनावरांना हाेत आहे. त्यामुळे लम्पीची लागण झालेली जनावरे रस्त्यावर फिरताना दिसल्यास जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी, असे आदेश रत्नागिरी प्रशासनाने दिले आहेत.

राजापूर तालुक्यात ९१ जनावरे लम्पी रोगाने आजारी आहेत. तर १० जनावरांचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यात १७५ जनावरे आजारी असून, १७ जनावरांचा मृत्यू झाला. तर रत्नागिरी तालुक्यामध्ये ३० जनावरांचा मृत्यू झाला असून, २४५ जनावरे लम्पीग्रस्त आहेत. संगमेश्वरमध्ये ४ जनावरांचा मृत्यू झाला असून, २७ जनावरे आजारी आहेत. दापोली तालुक्यात ५१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जनावरे आजारी आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here