अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अद्याप निश्चित झाले नाही. तर, शरद पवार गटालाही आमदारांचा मोठा पाठिंबा आहे.त्यातच, शरद पवार यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला असून, राज्यातील काही ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. यावेळी, सोडून गेलेल्यावर ते अप्रत्यक्षपणे टीका करतात. दरम्यान, शरद पवारांशी आजही बोलणे होते. त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. आता, नव्या संसदेतील थेट शरद पवारांसमवेतचा फोटो त्यांनी शेअर केलाय.नव्या संसदेतील राज्यसभा भवनमध्येही खासदारांनी फोटो काढून या सभागृहाचं कौतुक केलंय. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासमवेतचा फोटो शेअर करत माहिती दिली. नवीन संसद भवनातील इलेक्ट्रीफाईंग दिवस, असे सांगत आजच्या पहिल्या दिवसाचं वर्णन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. येथील राज्यसभा चेंबर चमत्कारीक आहे, त्यातच हा क्षण शरद पवार साहेबांसोबत शेअर करण्यात आल्याने क्षण अधिकच खास बनलाय. येथील कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच, खरोखरच लक्षात ठेवावा असा आजचा दिवस !, असे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासमवेतचा फोटो शेअर करत खरोखरच लक्षात...