डिसेंबर महिन्यात मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवर होऊ घातलेल्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.तथापि, प्रशासनाने निवडलेली खासगी जागा देण्यास संबंधित मालकाने नकार दिला आहे. त्यामुळे पर्यायी जागेची चाचपणी प्रशासनाकडून केली जात आहे.
भारतीय नौदलाच्या स्थापनेपासून प्रथमच कोकणात नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्गवर 4 डिसेंबर रोजी दिमाखात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आणि राज्यातील मंत्री उपस्थितीत राहणार आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जागेचा शोध सुरू