ई- के.वाय.सी. व आधार सिडींग करा अन्यथा सहा हजार विसरा’, कृषी विभागाची जनजागृती


गणेशभक्तांनो उत्सवानिमित्त गावी आला आहात तर पी.एम किसान योजनेचे ई- के.वाय.सी. व आधार सिडींग लवकरात लवकर करा असे आवाहन कृषी विभागातर्फे ठिकठिकाणी बॅनर्स, फलक लावून करण्यात येत आहे.ई- के.वाय.सी. व आधार सिडींग करा अन्यथा सहा हजार विसरा’, अशीही जनजागृती सुरू आहे.

खेड तालुका कृषि अधिकारी कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या नागरिकांना पी. एम. किसान योजनेचे ई- के.वाय.सी. व आधार सिडींग करण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी ई-केवायसी करण्याचे आवाहन करणारे बॅनर्स व फलक लावण्यात आलेले आहेत. ई-के.वाय सी. व आधार सिडींग प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थी वार्षिक मिळणारे सहा हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ई- केवायसी प्रक्रिया वारंवार सांगूनही पूर्ण न करणारे किंवा संपर्क न होणारे लाभार्थी नियमाप्रमाणे कायमचे अपात्र ठरण्याचा धोका आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button