सिंधुदुर्ग जिल्ह्यात एटीएमद्वारे फसवणूक प्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा


एटीएम मालकाचेच कार्ड वेळोवेळी मशिनमध्ये टाकून येणारे पैसे बोटाच्या साहाय्याने अडवून ४९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कसाल येथील एटीएम मशीनमध्ये घडला.नितीन सीताराम सावंत (वय ५६, रा. कोलगाव-भोमवाडी, ता. सावंतवाडी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दोघा अनोळखींविरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
जिल्हा बँकेच्या कसाल येथील एटीएममध्ये १० सप्टेंबरला सकाळी १० ते ११.३० या दरम्यान हा प्रकार घडला. दोघा संशयितांनी वेगवेगळ्या वेळेत एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून त्यांच्याकडील कार्डमधून वेगवेगळ्या रकमा कढताना, कॅमेऱ्यात अर्धवट टिपले जाईल, अशी दक्षता घेतली. एटीएम मशिनमधून रक्कम बाहेर येणाऱ्या कप्प्यात ट्रांजेक्शन सिस्टममध्ये नोंद होऊ नये, या उद्धेशाने पैसे एटीएममधून बाहेर पडण्यापूर्वी हाताने अडथळा निर्माण करून ४९ हजार ५०० रुपये रक्कम गैरप्रकारे काढून फसवणूक केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button