
गुरु रविदास महाराज समाजमंदिर ते मुख्य रस्ता याच काँक्रिटी करण आणि सुशोभी करण कामाचे भूमिपूजन
रत्नागिरी तालुका गुरु रविदास विकास मंडळ या संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या समाज मंदिर तरवल जाकदेवी येथे आज जिल्हा परिषद शेष निधीमधून जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सन्मा परशूराम कदम यांच्या सहकार्यातून मुख्य रस्ता ते समाजमंदिर काँक्रिट रस्ता आणि समाजमंदिर आवारात पेवरब्लोक बसविणे या कामाचा भूमिपूजन सोहळा पंचायत समिती सदस्य सन्मा. अभय खेडेकर राष्ट्रीय गुरु रविदास परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरी चे चेअरमन सन्मा. परशुराम निवेंडकर गुरु रविदास विकास मंडळाचे तालुका अध्यक्ष श्री. प्रकाश खेडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष जगन्नाथ फणसोपकर कोषाध्यक्ष यशवंत कोटवडेकर सहसचिव दत्ताराम मेढेकर, सुहास वरेकर श्री. चव्हाण गुरुजी काँट्रॅक्टर श्री. पडावे इत्यादी उपस्थित होते या वेळी मान्यवरांचा जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
www.konkantoday.c9m