रत्नागिरी जिल्ह्यात तसेच रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरे रस्त्यावरून फिरत आहेत याबाबत पालकमंत्री उदय सामंत व प्रशासन यांच्यात उपाययोजना करण्याबाबत बैठक झाली होती त्याप्रमाणे या मोकाट गुरांना पकडून चंपक मैदान येथे मोकळ्या कोंडवाड्यात ठेवण्यात येणार आहे यासाठी चंपक मैदान येथे तारेचे कंपाउंड घालून त्यामध्ये मोकाट गुरांना सोडण्यात येणार आहे मोकाट गुरे पकडण्यासाठी पाच पथके निर्माण करण्यात आली होती याबाबत नुकतीच बैठक होऊन रविवारपासून मोकाट गुरांवर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते परंतु अद्याप चंपक मैदान येथे बांधण्यात आलेला कोंडवाड्याचे काम पूर्ण झालेले नाही या कोडवाड्यासाठी तारेचे कंपाउंड व गेटचे केवळ खांबच उभे राहिले आहेत सध्या सुरू असलेल्या कामाच्या गतीवरून हे सर्व काम पूर्ण होण्यास काही दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे सध्या मोकाट गुरांनी आपले वास्तव्य अद्यापही रत्नागिरी शहरातील रस्त्यावर ठेवले आहे या मोकाट गुरामुळे अपघात होऊन जखमी होण्याचे व प्राणहानी होण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे प्रशासनाचा हा उपक्रम प्रत्यक्षात खरोखर अमलात आल्यास त्याचा रत्नागिरीकर जनतेला फायदा होऊ शकणार आहे मात्र त्यासाठी अजूनही वाट पहावी लागणार आहे
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या मोकाट गुरांप्रमाणे चंपक मैदान येथे बांधण्यात येणारा मोकाट कोंडवाडा अजूनही मोकळाच