थोडीशी चूक नडली, गणेशोत्सवासाठी मुंबई अंधेरी येथून गावी येणाऱ्या युवकाचा मृत्यू


गणेशोत्सवासाठी रस्ता मार्गाने व कोकण रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत आहेत गावी येण्यासाठीचा चाकरमानी मिळेल ती वाहने घेऊन येत आहेत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती गणेशोत्सवाला काही तास राहिले असतानाच रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे येथे दुचाकीचा मोठा अपघात झाला आहे. मोटरसायकलवर येणाऱ्या तरुणांना एक छोटीशी चूक नडली मुंबई अंधेरी येथून आपल्या गावी संगमेश्वर साडवली येथे निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी वरचे नियंत्रण सुटले. महामार्गावर असलेल्या दुभाजकावरती ही दुचाकी आदळून यामध्ये दुचाकी चालक सौरभ सुरेश शिगवण वय 23 या युवकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या दुचाकीवर मागे सौरभ याचा मित्र देवेंद्र सुरेश रावणंग वय 21 वर्षे व्यवसाय नोकरी रा. कर्ली, ता. संगमेश्वर हाही मुंबई अंधेरी येथून गावी येत होता. यावेळी सौरभ हा गाडी चालवत होता. यावेळी त्याचा मागे बसलेला मित्र देवेंद्र हा सुदैवाने सुखरूप बचावला आहे. ऐन गणेशोत्सवात साडवली संगमेश्वर येथील शिगवण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
17 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी 05:30 वा चे सुमारास देवेंद्र व त्याचा मित्र सौरभ दोघे दुचाकी घेऊन चालले होते. अंधेरी मबंई ते संगमेश्वर असे दुचाकी चालवित घेऊन जात असताना मौजे असुर्डे बनेवाडी खिंड या ठिकाणी रविवारी 11.45 वा. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. ओव्हरेट करण्याच्या प्रयत्नात असताना महामार्गावर असलेल्या लोखंडी पत्र्याच्या डिव्हार्डरला मोटार सायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात हे दोघे तरुण मोटरसायकल वरून उडाले.यावेळी सौरभ लोखंडी डिव्हार्डरच्या मध्यभागी पडला त्या अपघातात सौरभ याच्यावर डोक्याला व अन्यत्र गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यावेळी महामार्गावर असलेल्या अॅम्बुलन्सने सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सौरभला तात्काळ दाखल करण्यात आले मात्र तपासून डॉक्टरानी सौरभ याला तपासून मयत घोषित केले. या अपघाताचे वृत्त कळताच तात्काळ महामार्ग पोलीस व सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या सगळ्या अपघात प्रकरणाची नोंद चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याप्रकरणी अधिक तपास सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड हे करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button