झरेवाडी ग्रामस्थांची गैरसोय होणार दूर
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या सुचनेप्रमाणे व भाजप चे नेते दादा दळी व झरेवाडी स्थानिक ॲड. अवधूत कळंबटे यांच्या पाठपुराव्यामुळे झरेवाडी ग्रामस्थांनची गैरसोय दूर होणार आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे व झरेवाडी पासून चांदेराई पंचक्रोशीतील लोकांना या महामार्गांवर येताना जाताना उंच भागामुळे, खड्डे मुळे त्रास होत होता तसेच झरेवाडी शेतीशाळे जवळ बस स्टॉप वर बस थांबत नव्हती व बस साठी उभे राहणे ग्रामस्थांना गैरसोयीचे होत होते. या समस्या ग्रामस्थांच्या वतीने ॲड. अवधूत कळंबटे यांनी दादा दळी यांच्या कानावर घातल्या दादा दळी यांनी बांधकाम मंत्री ना. चव्हाण साहेबांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या मार्फत चव्हाण साहेबांच्या कानावर विषय घालून आज सकाळी संबधित ठेकेदार व ग्रामस्थ यांची भेट घडवून आणून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे आज सकाळी १० वाजता संबधित ठिकाणी ठेकेदार शेतलांनी हे स्वतः हजर राहून त्यांनी खड्डे तात्काळ भरून बंद केलेला एक्सेस सुरु करून व बस स्टॉप वर दोन्ही बाजूला ग्रामस्थांना उभे राहण्याची व्यवस्था करून देतो असे सांगितले.
यावेळी दादा दळी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्रजी चव्हाण साहेबाना सांगून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांची ग्रामस्थांसोबत चर्चा घडवून पाली हून येणारे वा रत्नागिरी हून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व झरेवाडी व चांदेराई पंचक्रोशीच्या लोकांसाठी एक्सेस साठी चर्चा करून सर्वांच्या सोयीचा मार्ग काढू.
यावेळी झरेवाडी येथील ॲड. अवधूत कळंबटे, सुभाष कळंबटे, गिरीश शितप, प्रविण कळंबटे, जयवंत कळंबटे, मोरेश्वर कळंबटे, मंदार कळंबटे, अमोल कळंबटे, कांता देसाई, निलेश सनगरे हे सर्व उपस्थित होते.
www.konkantoday.com