
गर्दीचा फायदा घेत बस स्थानकावरील महिलेच्या पर्स मधील अडीच लाखाचे दागिने चोरट्याने लांबविले
खेड मध्ये चोऱ्याचे प्रमाण वाढले असून चोरट्यानी आता येथील बस स्थानका वर गणपती साठी दाखल होणाऱ्या चाकर मान्यांना लक्ष्य केले आहे गर्दीचा फायदा उचलत एका अज्ञात चोरट्याने विवाहितेचे सुमारे २ लाख ४० हजाराचे दागिन्यांवर डल्ला मारला हा प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघड झालावैभवी झुजम ही महिला एस.टी.स्टॅन्ड खेड येथे १२.२० वा.चे दरम्याने खेड येथुन शेरवली एस.टी. बस मध्ये बसलेले असताना यांचे पर्सच्या एका डबीमध्ये ठेवलेले सोन्याचे लहान, मोठे असे दोन मणीमंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले
www konkantoday.com