
गणपती उत्सवात ग्राहकांना विजबिल भरणा मध्ये मुदत वाढ मिळण्याची गुहागर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
कोकणामध्ये गणेशोत्सव हा सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो.सध्याच्या महागाईच्या जगात गोर,गरिबांना महागाईने ग्रासलेले आहे.विजेचे बिल भरणा करणे आणि गणपती सारखा मोठा सण आल्याने नागरिकांची आर्थिक गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे.गणपती उत्सवाच्या गडबडीमध्ये काही नागरिकांचे विज बिल थकीत राहू शकते.या सर्व बाबींचा विचार करता गणपतीच्या सणामध्ये गुहागर तालुक्यातील नागरिकांना बिल भरणेसाठी सवलत मिळावी व विज वाहिनी तोडण्यात येवू नये.असे निवेदन गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रियाज भाई ठाकूर यांनी महावितणरचे उपकार्यकारी अभियंता मा.श्री.सूद व शिंदे यांना देण्यात आले.
www.konkantoday.com