खेड जवळील भरणे पुलाखाली बेकायदेशीर अतिक्रमणविरोधात पोलिसांची धडक मोहीम


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवरील खेड जवळील भरणे पुलाखाली अनेकांनी दुतर्फा छोटे छोटे गाळे टाकून अतिक्रमणे उभी केली होती. तर अनेकजण या ठिकाणी वाहने पार्क करून जात असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रोहा येथील सहाय्यक अभियंता यांच्याकडे करण्यात आल्या होत्या, त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण अधिनियम २००२ चा भंग केल्याप्रकरणी येथील सर्व व्यावसायिकांना ही अतिक्रमण हटविण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली होती.याबाबत १३ सप्टेंबर रोजी खेड पोलिसांकडून भरणे नाका परिसरात ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे क्रेन, जेसीबी आणि पोलीस फौजफाट्यासह भरणे येथे दाखल होताच. अतिक्रमण करणारांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी ट्रॅक्टरमध्ये भरून आपापले साहित्य काढून नेले तर पुलाखाली बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या दुचाकी पोलिसांनी गाडीत भरुन पोलीस ठाण्यात जमा केल्या, पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबाबत नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button