कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखवण्याविरुद्ध कारवाई करण्याचीहिंदू जनजागृती समितीची मागणी
तामिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा व कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने देशव्यापी आंदोलन पुकारले. काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समितीने या नेत्यांचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्या या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. मलेशियातील हिंदुत्ववादी संघटनांनी भारतीय उच्चायुक्तांकडे संबंधिंतांवर कारवाईची मागणी केली आहे. ,काल झालेल्या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले, हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही सर्व हिंदूंसोबत आहोत. यंदापासून हिंदूंनी हलालमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. या सर्व भावना आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पोहोचवणार आहोत. हिंदू जनजागृती समितीचे विनय पानवळकर, हिंदू राष्ट्रसेनेचे चंद्रकांत राऊळ, कुवारबाव व्यापारीसंघाचे प्रभाकर खानविलकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी संजय जोशी, विनोद गादीकर, भास्कर खडपे, राजेंद्र पटवर्धन, दादा ढेकणे, विक्रम जैन, धनंजय पाथरे, प्रशांत डिंगणकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर यांच्यासमवेत अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com