ऐन पावसाळ्यात सिंधुदुर्गात आंबा कलमांना मोहोर आला
सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम कोकणातल्या निसर्गातही पाहायला मिळत आहे. ऐन पावसाळ्यात सिंधुदुर्गात आंबा कलमांना मोहोर आला आहे. तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे, किल्ले निवती भागात हापूसची फळधारणा झाल्याचं चित्रं पहायला मिळतंय.यामुळे आंबाच्या सिजन लवकर सुरु होईल असे वर्तवले जात आहे.
भर पावसाळ्यात कोकणात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतंय हा मोहोर आंबा बागायतदारांनी आच्छादन टाकून टिकवून ठेवल्यास त्यांना मोठा फायदा होउ शकतो.
कोकणात सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला असतानाच सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात आंबा कलमांना मोहोर आला आहे. तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावात किल्लेनिवती भागात हापूसला आंबे आल्याचं चित्रं पहायला मिळत आहे.
भर पावसाळ्यात कोकणात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतं आहे. भर पावसाळयात आलेला मोहोर प्रगतशील आंबा बागायतदारांनी टिकवून ठेवल्यास त्यांना त्याचा मोठा फायदा होउ शकतो. त्यासाठी फवारण्या आणि आच्छादन करून मोहोर टिकवून त्यांची फळं बाजारपेठेत आल्यास बागायतदारांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
www.konkantoday.com